Cyber Crime: सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्याने घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:02 PM2022-01-11T14:02:23+5:302022-01-11T14:02:42+5:30

पोलीस आपला गोपनीय क्रमांक किंवा ओटीपी कोणालाही शेअर करुन नका असे सातत्याने आवाहन करीत असतात

Retired Assistant Commissioner of Police gang raped by cyber thieves in pune | Cyber Crime: सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्याने घातला गंडा

Cyber Crime: सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्याने घातला गंडा

Next

पुणे : वाढत्या सायबर चोरीच्या घटनांमुळे बँका, पोलीस आपला गोपनीय क्रमांक किंवा ओटीपी कोणालाही शेअर करुन नका असे सातत्याने आवाहन करीत असतात. असे असताना एका सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्यांनी केवायसी अपडेटच्या नावाखाली गंडा घातला आहे.

याप्रकरणी बालेवाडी येथे राहणार्‍या ६३ वर्षांच्या सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी सहायक पोलीस आयुक्तांना मोबाईलवर फोन करुन तुमचे सीम कार्ड केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना लिंक पाठवून ती लिंक अपलोड करायला सांगितली. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक खात्यातून परस्पर ४९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले. हा प्रकार ३ जुलै २०२१ रोजी दुपारी अध्या तासात हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title: Retired Assistant Commissioner of Police gang raped by cyber thieves in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.