स्वस्तात शेत जमीन देण्याचे आमिष दाखवून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:09 PM2023-03-27T16:09:28+5:302023-03-27T16:09:43+5:30

आर्थिक नुकसान करण्याची धमकी देऊन ६ लाख रुपयांची खंडणी उकळली

Retired police officer cheated by giving cheap farm land | स्वस्तात शेत जमीन देण्याचे आमिष दाखवून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक

स्वस्तात शेत जमीन देण्याचे आमिष दाखवून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक

googlenewsNext

पुणे : भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगून ६० लाख रुपये घेऊन जमीन न देता फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर पोलीस अधिकाऱ्यालाच धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भिती घालून आणखी ६ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी आंबेगाव येथे राहणार्या एका ५९ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियांका निलेश सूर्यवंशी (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका पोटे यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणती शेतजमीन खरेदी करुन दिली़ नाही. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे धमकावले. आर्थिक नुकसान करण्याची भिती घातली. ते सहायक पोलीस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी घेतली. या पोलीस अधिकार्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Retired police officer cheated by giving cheap farm land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.