झाडावरील आंबे काढताना विजेचा शॉक लागून सेवानिवृत्त पोलीसाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 21:45 IST2023-05-15T21:45:29+5:302023-05-15T21:45:43+5:30
राजगुरुनगर मधील घटना

झाडावरील आंबे काढताना विजेचा शॉक लागून सेवानिवृत्त पोलीसाचा मृत्यू
राजगुरुनगर: झाडावरील आंबे काढायला गेलेल्या सेवानिवृत्त पोलीसाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजगुरुनगर येथे घडली आहे. मारुती सिताराम घुमटकर (वय६५ रा.माळी मळा,वाडा रोड राजगुरुनगर ,ता खेड ) असे मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त पोलिसाचे नाव आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त पोलीस घुमटकर हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील झाडावर आंबे काढण्यासाठी चढले होते. या आंब्याच्या झाडाच्या फांद्यातून विद्युत वाहक तारा गेलेल्या होत्या. विद्युत वाहक तारा लक्षात न आल्यामुळे आंबे काढत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक बसला. या घटनेत घुमटकर झाडावरुन खाली पडून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे राजगुरुनगर परिसर हळहळ व्यक्त होत आहे.