पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाची सूत्रे सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 06:49 PM2021-06-30T18:49:57+5:302021-06-30T18:50:34+5:30
जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये तसेच कार्यक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल झगडे यांचे संकेत
पुणे: पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाचा कारभार आता सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार व्यापक सार्वजनिक हितासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीच्या वैधानिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये तसेच कार्यक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल.
या बाबींकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत झगडे यांनी दिले आहेत. तसेच ही संस्था शासन - प्रशासन सुधारणा करण्यासाठी सामान्य नागरिक, तरुण, सरकारी यंत्रणेच्या व्यापक सहभाग करून घेण्यासाठीही आवश्यक त्या चळवळीस चालना देईल. एकंदरीतच शासन व्यवस्था ही अधिकार गाजवणारी व्यवस्था न राहता ती सेवा पुरवठादार म्हणून कसे काम करेल ह्या संस्कृतीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल. असेही त्यांनी नमूद केले.