निवृत्त प्राध्यापकाची पेन्शनमधून कोविड सेंटरला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:48+5:302021-05-31T04:08:48+5:30

प्रा. रोटे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उपक्रम व आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना मदत, ...

Retired professor's help to Covid Center from pension | निवृत्त प्राध्यापकाची पेन्शनमधून कोविड सेंटरला मदत

निवृत्त प्राध्यापकाची पेन्शनमधून कोविड सेंटरला मदत

Next

प्रा. रोटे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उपक्रम व आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना मदत, भिक्षेकरी लोकांना कपडेवाटप, मूकबधिर शाळांना अन्नदान, असे उपक्रम ते दरवर्षी घेतात. मागील वर्षी केरळ पूरग्रस्त व कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी आपल्या पेन्शनच्या पैशातून देणगी देत सामाजिक बांधिलकी कायम जपली जपली होती. या वेळी त्यांनी बारामती येथील कोरोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणारे ५० कोरोना योद्धे यांना प्रत्येकी एक डझन हापूस आंबे भेट दिले. तसेच, कसबा येथील सातव कोविड सेंटरला दहा हजार रुपयांची मदत दिली. हा मदत निधीचा धनादेश सभापती सातव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी बारामती तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर,तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, आरोग्य सभापती सूरज सातव, डॉ. सचिन खोमणे, संपत जायपत्रे, निर्मला रोटी, अॅड. शुभांगी गावडे, विद्या गावडे उपस्थित होते.

प्रा. अनंता रोटे यांनी आपल्या पेन्शनमधून कोरोना योद्धांचा सन्मान केला.

३००५२०२१-बारामती-०२

Web Title: Retired professor's help to Covid Center from pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.