खातेदाराचे हरवलेले पैसे केले परत, बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:29 AM2018-08-15T00:29:44+5:302018-08-15T00:30:15+5:30
पाटस येथील बँक आॅफ महाराष्ट्र परिसरात खातेदाराचे हरवलेले १४ हजार ४०० रुपये वसुली अधिका-याने परत केले. या अधिकाºयाचा खातेदारांनी विशेष सत्कार केला.
केडगाव - पाटस येथील बँक आॅफ महाराष्ट्र परिसरात खातेदाराचे हरवलेले १४ हजार ४०० रुपये वसुली अधिकाºयाने परत केले. या अधिकाºयाचा खातेदारांनी विशेष सत्कार केला.
शेतकरी रामचंद्र दाजी खारतोडे (रा. पाटस, ता. दौंड) हे बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. खारतोडे यांच्याकडून १४ हजार ४०० रुपये बँक परिसरात पडले होते. यावेळी वसुली अधिकारी महेश शेलार यांना ही पडलेली रक्कम सापडली. शेलार यांनी तत्काळ बँक शाखा अधिकारी गंगाधर फडके यांना सापडलेल्या रकमेबाबत माहिती दिली. फडके यांनी पैसे हरवलेल्या खातेदार ग्राहकाचा शोध घेतला. ही रक्कम खारतोडे यांची असल्याची खात्री करून त्यांना पैसे परत केले. यावेळी बँक शाखाधिकारी गंगाधर फडके, दिलीप दंडवते, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित खातेदार ग्राहकांनी शेलार व फडके यांचा सत्कार केला.