स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:04 PM2018-10-03T22:04:34+5:302018-10-03T22:05:42+5:30

पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Reveal the information of swine flu to the citizens : Collector's information | स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

Next
ठळक मुद्देस्वाईन फ्ल्यूवरीक कार्यशाळेचे उद्घाटन पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक

पुणे : पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे. आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना पोहचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिल्या.  
       जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या वतीने आयोजित ‘स्वाईन फ्ल्यू आजारावर रोगनिदान उपचार व प्रतिबंध’या कार्यशाळेत नवल किशोर राम बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य सहाय्यक संचालक प्रदीप आवटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भगवान काकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी वैद्यकीय अधिकारी सदाशिव जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.  
  स्वाईन फ्ल्यू या आजारावरील उपचारांची अंमलबजावणी करत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून नवल किशोर राम म्हणाले, स्वाईन फ्ल्यू या आजारावर करत असलेल्या उपचार पध्दतीच्या वस्तुनिष्ठ अहवालाची नोंद सर्वांकडे असणे आवश्यक आहे.  वातावरणातील बदल व पूवार्नुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य विषयक शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष द्यावे.
     स्वाईन फ्ल्यू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्यात याव्यात.तसेच शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.तसेच औषध साठयाची माहिती घेतली.

Web Title: Reveal the information of swine flu to the citizens : Collector's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.