'धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या...' आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 06:02 PM2023-01-06T18:02:46+5:302023-01-06T18:02:57+5:30

अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे

reveals the shocking form of conversion in Alandi | 'धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या...' आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस

'धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या...' आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस

googlenewsNext

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याचे समोर आले आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी उद्धव कांबळे (वय ४८ वर्षे, रा. पद्मावती रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधाकर सूर्यवंशी व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या परिसरात राहणाऱ्या महादेव गवळी यांच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले, की एका महिला त्या घरातील लोकांना छोट्या ग्लासमधून लाल रंगाचे द्रव्य हे येशूचे रक्त असल्याचे सांगत होती. व त्यांना ते प्यायला सांगत होती. अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे. तसेच, धर्म परिवर्तनाबाबत विचारले असता, त्याबाबत आमची चौकशी सुरु आहे असे त्यांनी सांगितले.

या धर्म परिवर्तन करण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका महिलेने हातात ट्रे घेतला असून त्यामध्ये पाच ते सहा छोटे ग्लास आहेत. या ग्लासमध्ये लाल रंगाचे द्रव्य आहे. ती महिला ते द्रव्य घरातील महिला व व्यक्तींना ते येशूचे रक्त असल्याचे सांगून त्यांना प्यायला सांगत असल्याचे दिसून येत आहे.

जिथे समाधीस्थ विश्वाची माऊली... तिथेच धर्माची काहीली..

गेल्या काही दिवसापासून तीर्थक्षेत्र आळंदी आणि परिसरात धर्मांतर करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाला आहे. आळंदीत सारख्या पावन भूमीत या टोळीत लोक भोळ्या भाबड्या लोकांना येशूचे रक्त पाजून त्यांचे सगळे रोग, आजार आणि कष्ट संपतील म्हणत हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत. याविषयी आळंदी शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: reveals the shocking form of conversion in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.