शेवाळवाडी येथे वाळूमाफियांना महसूलचा दणका, 20 ट्रक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:43 AM2018-11-13T00:43:57+5:302018-11-13T00:44:32+5:30

मोठी कारवाई : २० ट्रक ताब्यात, ७० लाखांचा दंड होणार वसूल

Revenue bolt to the sandmafia at Shewalwadi, 20 trucks in possession | शेवाळवाडी येथे वाळूमाफियांना महसूलचा दणका, 20 ट्रक ताब्यात

शेवाळवाडी येथे वाळूमाफियांना महसूलचा दणका, 20 ट्रक ताब्यात

Next

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील महसूल पथकाने पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी येथे सोमवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वीस वाळूचे ट्रक ताब्यात घेतले आहेत. वाळू वाहतूकदारांवर झालेल्या कारवाईमधून शास्तीची रक्कम मिळून सुमारे ७० लाख रुपयांचा महसुली दंड शासनाला जमा होणार असल्याची माहिती महसूल पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे संतापलेल्या वाळूमाफियांनी या वेळी मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, वाळूमाफियांचा हस्तक अनोळखी तरुणांनी बेकायदेशीर गर्दी जमवून महसूल पथकास अरेरावी करीत, दडपशाहीने कारवाई करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केल्याने संख्येने कमी असलेल्या पथकाची केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, कोणत्याही दबावाला न जुमानता अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई केली. दिवाळीची शासकीय सुट्टी व सातबारा संगणकीकरणाच्या कामात तलाठी, मंडलाधिकारी व्यस्त असल्याने राजरोसपणे पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधपणे वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच होती. वरिष्ठ कार्यालयातील आदेशानुसार हवेलीतील महसूल पथकाने वाळूचे अवैध होलसेल मार्केट समजल्या जाणाºया शेवाळेवाडी येथील ठिकाणी कारवाई केल्याने अवैध वाळू वाहनांचे मालक-चालक व त्यांच्या सहकाºयांनी खूप मोठा जमाव जमवून महसूल पथकास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल पथकाने कारवाई करत आपले कर्तव्य चोख बजावल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, उरुळीकांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, थेऊरचे मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे, तलाठी दिलीप पलांडे, योगीराज कनीचे, प्रदीप जवळकर व सर्व सजामधील कोतवाल या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. पकडण्यात आलेल्या या प्रत्येक वाहनांमध्ये अंदाजे चार ते पाच ब्रास वाळू आढळून आली आहे, त्याबाबतचा रितसर पंचनामा करण्यत आला आहे. पुणे जिल्ह्यात कोठेही वाळूचे लिलाव झालेले नाहीत, त्याचप्रमाणे इतरही जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने वाळू पुणे शहराकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

२० वाळूच्या वाहनांमधील दोन वाळूची वाहने पळून गेलेली आहेत. याबाबत, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत. पकडलेली वाहने हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करण्याचे काम सुरू आहे. वाहनचालक वाहनांच्या चावीसह पळून गेल्याने संबंधित वाहने ताब्यात घेण्यास अडथळे येत आहेत. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहणार आहे.
- चंद्रशेखर दगडे, मंडलाधिकारी, थेऊर
 

Web Title: Revenue bolt to the sandmafia at Shewalwadi, 20 trucks in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.