लोकांनी बगावत करण्याआधी लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:04+5:302021-04-08T04:11:04+5:30
पुणे : इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ...
पुणे : इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, असा इशारा वंचित बहुजन विकास आघडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी दिला.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजपने त्याचीच कॉपी केली आहे. पंढरपूर देवस्थान बाहेरील व्यावसायिकांना भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. लोकांनी बगावत करण्याआधी सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.
परमबीर सिंग आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? असा सवाल करून आंबेडकर म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे. सरकार लॉकडाऊनबाबत वंचितसोबत बोललेले नाही, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही.