लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:47 PM2021-04-07T15:47:57+5:302021-04-07T15:48:33+5:30

परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल..

Reverse your decision before people rebel; Prakash Ambedkar's implicit warning to Thackeray government | लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

Next

पुणे : इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा असा इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पुण्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कठोर निर्बंधांसह विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप कॉपी कॅट आहे.पंढरपूर देवस्थान बाहेरील व्यावसायिकांना भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. नंतर मग आम्ही एक आणि तुम्ही दुसरी भूमिका घेताय असं म्हणू नये.

दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत.त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही, अशा शब्दात आंबेडकरांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.

परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का?पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे.
सरकार लॉकडाऊ बाबत वंचितसोबत बोललेले नाही, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही.

अमित शहा देशाचे मालक नाही, प्रत्येकजण मालक आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर आहेत. त्यांची चर्चा काय झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आला हे महत्त्वाचं आहे असाही टोला आंबेडकर यांनी यावेळी लगावला.

Web Title: Reverse your decision before people rebel; Prakash Ambedkar's implicit warning to Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.