Cyber Crime: रिव्ह्यू टास्क केल्यास कमिशन मिळेल; तरुणाने गमावले ३४ लाख

By भाग्यश्री गिलडा | Published: May 12, 2023 03:27 PM2023-05-12T15:27:29+5:302023-05-12T15:28:15+5:30

टेलिग्राम वर रिक्रूटर्स झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे आध्या रिधान हिच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Review tasks will earn commission The young man lost 34 lakhs | Cyber Crime: रिव्ह्यू टास्क केल्यास कमिशन मिळेल; तरुणाने गमावले ३४ लाख

Cyber Crime: रिव्ह्यू टास्क केल्यास कमिशन मिळेल; तरुणाने गमावले ३४ लाख

googlenewsNext

पुणे : सोशल मीडियावर रिव्ह्यू टास्क देऊन कमिशन देण्याच्या बहाण्याने ३४ लाख ७६ हजार ७०४ रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की टेलिग्राम वर रिक्रूटर्स झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे आध्या रिधान हिच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. अकिक वासुदेव रानडे (वय ३०, रा. ठाणे) यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पुण्यात कामाच्या ठिकाणी असताना अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. त्यामध्ये गुगल रिव्ह्यू टास्क चे काम पूर्ण केले असता त्यावर कमिशन मिळेल असा मजकूर होता. सुरुवातीला काही मोबदला देऊन रानडे यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत वेळोवेळी रानडे यांच्याकडून एकूण ३४ लाख ७६ हजार ७०४ रुपये उकळले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत हे करत आहेत.

Web Title: Review tasks will earn commission The young man lost 34 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.