जेईई मेन्स परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:46+5:302020-12-17T04:38:46+5:30
अर्धा डिसेंबर महिना संपला तरीही जेईई मेन्स परीक्षेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेबाबत कोणतीही सूचना प्रसिध्द केली नव्हती. त्यामुळे जेईई ...
अर्धा डिसेंबर महिना संपला तरीही जेईई मेन्स परीक्षेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेबाबत कोणतीही सूचना प्रसिध्द केली नव्हती. त्यामुळे जेईई परीक्षा होणार की नाही? जानेवारीत होणार की फेब्रुवारी महिन्यात होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, एनटीएसतर्फे मंगळवारी (दि.१५)जेईई मेन्स परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द केले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला होता. परंतु, हे परिपत्रक संकेतस्थळावरून काढून टाकले आहे. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निषंक यांनी जेईई परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यावर या गोंधळावर पडदा पडला.
प्रवेशपूर्व परीक्षांचे अभ्यासक दूर्गेश मंगेशकर म्हणाले, एनआयटी, ट्रिपल आयटी,अभियात्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे परिपत्रक प्रसिध्द करण्यापूर्वी निश्चितच काळजी घेणे अपेक्षित आहे. मंगळवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार होते. परंतु,लिंक उपलब्ध नसल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. मात्र,केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याने गोंधळ मिटला.