प्रांतोप्रांतीचे क्रांतीकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:22+5:302021-04-30T04:13:22+5:30
१९१० च्या सुमारास मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस असे अनेक क्रांतिकारक फासावर चढले. क्रांतियुद्धाची सुरुवात आता महाराष्ट्र, ...
१९१० च्या सुमारास मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस असे अनेक क्रांतिकारक फासावर चढले. क्रांतियुद्धाची सुरुवात आता महाराष्ट्र, पंजाब व बंगाल पुरती मर्यादित न राहता दक्षिणेत वणवा पेटू लागला.
तामिळनाडूतील त्रावणकोट संस्थानातील शेनकोटा या गावातील रघुपती अय्यर यांचा मुलगा वांछीनाथान याचा जन्म १८८६ मध्ये झाला. वडील एका मंदिरात पुजारी होते . जेमतेम शिक्षण पूर्ण करून वांछीनाथन वयाच्या विसाव्या वर्षी वनविभागात फॉरेस्ट गार्ड म्हणून नोकरीला लागला. क्रांतीकारक व्ही. व्ही. एस. अय्यर आणि एम. पी. टी. आचार्य यांनी सुरु केलेल्या 'भारत माता संगम' या क्रांतीकारकांच्या गुप्त संस्थेत वांछी सामील झाला. गुप्ततेची शपथ घेतली. त्याच सुमारास तिन्नेवेल्ली जिल्ह्यात नेमलेला ॲश या अधिकार्याने देशभक्त, संपादक यांना तुरुंगात टाकायला सुरुवात केली. स्वदेशी कंपन्या बंद पाडल्या. क्रांतीकारकांच्या रडारवर आता ॲश हा जिल्हाधिकारी आला होता. व्ही. व्ही. एस. अय्यर यांनी पांडिचेरीच्या फ्रेंच वसाहतीत गुप्त कार्य सुरु केले. वांछी अय्यर, धर्मराज अय्यर अशा अनेकांना त्यांनी पिस्तुलाची नेमबाजी शिकविली आणि ॲशला मारायची संधी क्रांतीकारकांना मिळाली. तिनेवेल्लीहून कोडाईकनालला जाणाऱ्या रेल्वेत ॲश होता त्याच गाडीत वांछी आणि त्याचा मेहुणा शंकर अय्यर यांनी जागा मिळवली. वाटेत 'मन्याची' या स्टेशनवर गाडी थांबली असता वांछीने खिडकीतून ॲशवर गोळ्या झाडल्या आणि पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चुकवत फलाटावरच्या स्वच्छतागृहात शिरला आणि आतून कडी घालून स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या तो दिवस होता १७ जून १९११...
--
फोटो २९ वांछीनाथन अय्यर(कॅम्पस पानावर)