हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची ९० वी पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:15 AM2021-02-28T04:15:10+5:302021-02-28T04:15:10+5:30

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक शहीद चंद्रशेखर आझाद यांची पुण्यतिथी 下下下राजगुरुनगर载载载 येथे आझाद यांच्या प्रतिमेला खेड तालुका पंचायत ...

Revolutionary Chandrasekhar Azad's 90th death anniversary in the birthplace of martyr Rajguru | हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची ९० वी पुण्यतिथी

हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची ९० वी पुण्यतिथी

Next

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक शहीद चंद्रशेखर आझाद यांची पुण्यतिथी 下下下राजगुरुनगर载载载 येथे आझाद यांच्या प्रतिमेला खेड तालुका पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती सतीश राक्षे यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी खेड तालुका भाजपचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, क्रांतिवीर राजगुरू ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे, सचिव अशोक कोरडे, हुतात्मा राजगुरू समितीचे सचिव सुशील मांजरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, योगेश गायकवाड, संजय आवटे, अरुण गुरव, शोभा सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुल देशमुख यांनी यावेळी क्रांतिकारक, भारतावरील आक्रमणे, स्वातंत्र्याचा लढा आणि त्याचा खरा अर्थ तसेच देश स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचे योगदान विषद केले. तर विठ्ठल पाचारणे यांनी आझाद यांची स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांति किर्द ????? सांगितली. त्यांचे भारत देशासाठीचे योगदान, बलिदान याची सविस्तर माहिती दिली, सुशील मांजरे यांनी आभार मानले.

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची पुण्यतिथी हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी साजरी करण्यात आली.

Web Title: Revolutionary Chandrasekhar Azad's 90th death anniversary in the birthplace of martyr Rajguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.