संगीत शिक्षणात रियाज आवश्यक
By admin | Published: April 26, 2017 04:20 AM2017-04-26T04:20:30+5:302017-04-26T04:20:30+5:30
संगीत शास्त्रीय असो वा सुगम, त्याच्या शिक्षणासाठी रियाज आवश्यकच आहे, असे प्रतिपादन संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त केले आहे.
पुणे : संगीत शास्त्रीय असो वा सुगम, त्याच्या शिक्षणासाठी रियाज आवश्यकच आहे, असे प्रतिपादन संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त केले आहे.
महर्षी धोंडो कर्वे यांच्या जयंतीनिमित्त नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या निरंतर व प्रौढ शिक्षण विभागातील सुगम संगीत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी ‘स्वरपुष्षांजली’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. स्वरपुष्पांजली अंतर्गत विद्यापीठ गीत, सावित्रीबार्इंच्या ओवी, महर्षी कर्वेंचे स्तुतिवचन, लोकगीते, नाट्यगीते, भाव-भक्तिगीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमास कविता टिकेकर, माधुरी करंबेळकर, कीर्ती कस्तुरे व मृदुला तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. ऋचा देशपांडे (हार्मोनिअम), नितीन निघोजकर व गोपाळ धुमाळ (तबला) यांनी साथसंगत केली.
प्रास्ताविक नीता वडके यांनी तर सूत्रसंचालन नूतन शेटे यांनी केले. पूर्णिमा चिकरमाने, भास्कर इगवे आदी उपस्थित होते.