सीएनजी गॅस गळतीमुळे रिक्षा जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 04:33 PM2018-09-02T16:33:28+5:302018-09-02T16:58:12+5:30

सिग्नलला थांबलेल्या रिक्षाला अाग लागल्याची घटना अाज दुपारी लुल्लानगर भागात घडली. सुदैवाने यात काेणतीही जीवीत हानी झाली नाही.

Rickshaw burnt due to CNG gas leakage | सीएनजी गॅस गळतीमुळे रिक्षा जळून खाक

सीएनजी गॅस गळतीमुळे रिक्षा जळून खाक

पुणे : सीएनजी गॅसच्या गळतीमुळे पुण्यातील लुल्लानगर चाैकात एका रिक्षाने अचानक पेट घेतला. रिक्षाला लागलेल्या अागीत ही संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने या अागीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. 

    नासीर बागवान (वय 40) असे रिक्षाचालकाचे नाव अाहे. नासीर हा रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरुन बिबवेवाडीकडून काेंढव्याकडे जात हाेता. लुल्लानगर येथील चाैकातील सिग्नलला ताे थांबलेला असताना अचानक रिक्षातून धूर येत असल्याचे त्याच्या लक्षात अाले. ताे तातडीने रिक्षाच्या बाहेर पडला अाणि बाजूला जाऊन उभा राहिला. अवघ्या काही मिनिटात अागीने रिक्षाला चारही बाजूने घेरले.  हि घटना अाज दुपारी 2.15 च्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच काैंढवा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या दाेन मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली. या अागीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नव्हते, तसेच रिक्षाचालकाला अाग लागल्याचे लक्षात अाल्याने ताे बाहेर पडल्याने कुठलिही जीवीत हानी झाली नाही. सीएनजीच्या गॅसगळतीमुळे अाग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत अाहे. या अागीत रिक्षाचालकाचा माेबाईलही जळून खाक झाला. 

    दरम्यान या घटनेमुळे या चाैकात माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. तसेच बघ्यांचीही गर्दी येथे झाली हाेती. 

Web Title: Rickshaw burnt due to CNG gas leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.