रिक्षा परवान्यांचे होणार नूतनीकरण

By admin | Published: October 1, 2016 03:45 AM2016-10-01T03:45:15+5:302016-10-01T03:45:15+5:30

एक नोव्हेंबर २०१४नंतर मुदत संपलेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे.

Rickshaw licenses will be renewed | रिक्षा परवान्यांचे होणार नूतनीकरण

रिक्षा परवान्यांचे होणार नूतनीकरण

Next

पुणे : एक नोव्हेंबर २०१४नंतर मुदत संपलेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सुमारे दीड हजार रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा होईल.
राज्य शासनाकडून आॅक्टोबर २०१४पूर्वी नूतनीकरण न घेतलेले परवाने रद्द केले होते. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत परवाना संपल्यानंतरही नूतनीकरण न घेतलेले परवानेही रद्द करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील विविध वाहतूक संघटनांनी हे परवाने रद्द करताना, १ नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन परिवहन विभागाने १ नोव्हेंबर २०१४नंतर रद्द झालेले परवाने नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Rickshaw licenses will be renewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.