रिक्षाचालकांच्या फसवणुकीची चौकशी
By admin | Published: September 17, 2014 12:13 AM2014-09-17T00:13:07+5:302014-09-17T00:13:07+5:30
रिक्षाचालकांकडून एका एजंटने दोन-दोन लाख रुपये घेतले, आरटीओमध्ये मीटर पासिंग केले तसेच डिलरकडून गाडीचा ताबाही दिला.
Next
पुणो : रिक्षाचालकांकडून एका एजंटने दोन-दोन लाख रुपये घेतले, आरटीओमध्ये मीटर पासिंग केले तसेच डिलरकडून गाडीचा ताबाही दिला. मात्र, रिक्षांना परमिटच नसल्याचे उजेडात आल्यानंतर आरटीओने त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणाची मोटार निरीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिले आहेत.
आरटीओ व डिलरच्या चुकीमध्ये रिक्षाचालकांची फसवणूक झाल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर याप्रकरणी आरटीओ कार्यालयाकडून वेगाने सूत्रे हलविण्यास सुरुवात झाली आहे. रिक्षाचालकांना नवीन रिक्षा घेऊन देण्यासाठी भूषण मोतीवाले हा एजंट म्हणून काम करतो. त्याने परमिट ट्रान्सफर करून नवीन रिक्षा
विकत घेऊन देण्यासाठी रिक्षाचालकांकडून पैसे घेतले. त्यामध्ये रिक्षाचे दीड लाख व परमिटचे 1 लाख 7क् हजार असे 3 लाख 2क् हजार रुपये घेतले. आतार्पयत 2क् रिक्षाचालकांकडून 45 लाख रुपये मोतीवाले याने घेतल्याचे उजेडात आले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी याबाबत सांगितले की, ‘‘या प्रकरणाची मोटार वाहन निरीक्षकांमार्फत चौकशी केली जात आहे. मोटार वाहन अॅक्टनुसार ही कारवाई केली जात आहे. निरीक्षकांचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर पुढील कारवाई केली जाईल.’’
मोटार वाहन निरीक्षकांनी याबाबतचा अहवाल दोन दिवसांमध्ये देण्यास सांगण्यात आले आहे. पुणो शहर व जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांनी 31 जून 2क्14 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार केली. त्या वेळी कवडे यांना याबाबत पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणो कवडे यांनी पाठपुरावा करून त्याचे पुरावे सादर केले. (प्रतिनिधी)
पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस आयुक्त सतीश माथूर यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पत्र पाठविण्यात आले आहे. रिक्षाचालकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक झाली असल्याने याप्रकरणी लक्ष घालून त्वरित फौजदारी कारवाई सुरू करण्यात यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.