Pune: रिक्षाचालकाचा तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By विवेक भुसे | Published: June 21, 2023 11:35 AM2023-06-21T11:35:35+5:302023-06-21T11:37:56+5:30

फिर्यादी तरुणी या सासवड रोडवरील एका कंपनीत कामाला आहे...

rickshaw puller's attempt to forcibly rape a young woman; Shocking types in Pune | Pune: रिक्षाचालकाचा तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune: रिक्षाचालकाचा तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

पुणे : कामावरुन घरी जात असताना पहाटेच्या सुमारास रिक्षा आड बाजूला थांबवून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा रिक्षाचालकाने प्रयत्न केला. वानवडी पोलिसांनी या रिक्षाचालकाला अटक केली आहे.
अनिकेत रिशु कुमार (वय २४, रा. शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी हांडेवाडी येथील एका २९ वर्षाच्या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर येथील रेल्वे मार्गाच्या कडेला, तसेच काळे पडळ रेल्वे गेटसमोर आणि काळे पडळ रेल्वे पुलादरम्यान २० जून रोजी पहाटे साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या सासवड रोडवरील एका कंपनीत कामाला आहे. कामावरुन घरी जाण्यासाठी त्या रिक्षाने जात होत्या. अनिकेत कुमार याने रिक्षा त्यांच्या घरी जाण्याच्या नेहमीच्या रोडने रिक्षा  न घेता अचानक निर्जन रस्त्याने रिक्षा नेऊ लागला. एका अंधार्‍या ठिकाणी त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबविली. फिर्यादीजवळ बसून त्यांच्या तोंडावर हात ठेवला. त्यांचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शरीरावर विविध ठिकाणी चिमटे काढून शारीरीक त्रास दिला़. त्यांनी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.

Web Title: rickshaw puller's attempt to forcibly rape a young woman; Shocking types in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.