इंग्लंडच्या ६ तरुणांची कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 08:41 PM2018-04-09T20:41:51+5:302018-04-09T20:41:51+5:30

लंडन येथील हे ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्यांच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षकण व शांतीचा संदेश देत आहेत. २० ते २५ दिवस केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या  पाच राज्यांमधून विविध संस्कृतींचा अभ्यास व चित्रीकरण ते करत आहेत. 

Rickshaw race between Kochi to Jaisalmer by England 6 youngsters | इंग्लंडच्या ६ तरुणांची कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौड

इंग्लंडच्या ६ तरुणांची कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौड

ठळक मुद्देस्वराज्याची राजधानी राजगडला भेट : भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौडचे आयोजन भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘जग्वार’ या वन्य प्राण्याचा संवर्धन होण्यासाठी जागृती मोहीम

वेल्हे : पृथ्वीवरील वनसंपत्ती आणि पर्यावरणरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी आणि विश्वबंधुत्व, ऐक्य व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासारखी लंडन येथील ६ ध्येयवेड्या तरुणांनी भारतातील कोची ते जैसलमेर या दरम्यान रिक्षा दौडचे आयोजन केले आहे. हे ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्यांच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षकण व शांतीचा संदेश देत आहेत. २० ते २५ दिवस केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पाच राज्यांमधून विविध संस्कृतींचा अभ्यास व चित्रीकरण ते करत आहेत. 
वेल्हे तालुक्यातील स्वराज्याची राजधानी राजगड किल्ल्याला त्यांनी भेट दिली. यावेळी लोकमत प्रतिनिधीशी  त्यांची बातचीत झाली. जेत्रो क्रोक, बेल फ्यारी, सयाम स्नोड, रुफ्फ रेज्जास, जेस्स्य फ्योबेर्स, लेम पुलं हे लंडनमधील ६ युवक अनोख्या रिक्षा दौडमध्ये सहभागी झाले आहेत. या प्रवासात कोची ते जैसलमेर असा ३ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास वीस दिवसांत पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या मोहिमेतून हे निसर्गप्रेमी परदेशी युवक भारतीय संस्कृती व पश्चिम घाटातील नैसर्गिक विविधतेचा अभ्यास करत आहेत. भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘जग्वार’ या वन्य प्राण्याचा संवर्धन होण्यासाठी जागृती मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. 


ब्रिटनमधील राजधानी लंडन येथील हे सहाही तरुण उच्चशिक्षित आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधता, सह्याद्री पर्वतरांग, निसर्गसौंदर्य यांचा अभ्यास करण्यासाठी व आस्वाद घेण्यासाठी वनजंगल वाचविण्यासाठी रिक्षादौड मोहीम केरळमधील कोची येथून सुरू केली. तसेच विश्वशांतीचा व बंधुत्वाचा संदेश या रिक्षा दौडमधून ते देत आहेत. हा लांब पल्ल्याचा प्रवास दोन रिक्षांमधून ते करत असून, रिक्षांच्या वर दुर्मिळ ह्यजग्वारह्ण प्राण्याची बसवलेली प्रतिकृती सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
वीस दिवसांत भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अंधार पडेल त्या खेडेगावात मुक्काम करणे, गावामधील ग्रामीण जेवण करणे, नदीवर अंघोळ असा नैसर्गिक प्रवास ते करत आहेत. 

.........................

भारतालील लोक अतिशय प्रेमळ असून यांना भेटून आम्हांला खूप आनंद झाला. येथील विविधतेतील एकता आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आम्हांला खूप आवडली. जागोजागी नागरिकांकडून सहकार्य व प्रेम मिळते याचे आम्हांला खूप आश्चर्य वाटते. भारत देश अतिशय निसर्गसंपन्न असून येथील निसर्ग आणि वन्यजीव टिकवण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रातील वेल्हे तालुक्यातील शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला आम्हांला खूप आवडला. या किल्ल्याची जागतिक वारसास्थळात नोंद असल्याने आम्ही तो आवर्जून पाहिला.    बेल फ्यारी, लंडन पर्यटक, रिक्षा दौड.
 

Web Title: Rickshaw race between Kochi to Jaisalmer by England 6 youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.