पुण्यातील रिक्षा संघटनांकडून २५ ऑक्टोबरला ‘बंद’ची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:11 PM2023-10-20T12:11:20+5:302023-10-20T12:12:33+5:30

शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन यासारख्या कंपन्यांकडून गिग कामगारांची पिळवणूक सुरु

Rickshaw unions in Pune call for agitation on 25th October 50 to 60 thousand rickshaw pullers participated in the strike | पुण्यातील रिक्षा संघटनांकडून २५ ऑक्टोबरला ‘बंद’ची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी

पुण्यातील रिक्षा संघटनांकडून २५ ऑक्टोबरला ‘बंद’ची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी

पुणे : रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस येत आहे. तसेच शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन यासारख्या कंपन्यांकडून गिग कामगारांची पिळवणूक चालू आहे. त्याच्या विरोधात (दि. २५) ऑक्टोबरला भारतीय गिग कामगार मंच रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक दिली आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन कंपनी सारख्या मोबाईल ॲप्लिकेशन वर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी युवक, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी युवक-युवती सामूहिक बंद पाळणार आहेत. या संपात एकूण ८ ते १० रिक्षाचालक संघटना सहभागी होणार असल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

यामध्ये बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र वाहतूक सेना-पुणे (शिवसेना), महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक संघटना पुणे, शिवनेरी रिक्षा संघटना, कॅब संघटना, सारथी वाहतूक आघाडी, द डिलिव्हरी बॉईज, कॅब चालक आधार फाउंडेशन आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा, क, ब, दुचाकी डिलिव्हरी बॉईज आंदोलनात सहभागी होणार आहेत.

५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार 

५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार आहेत. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासमोर स्वच्छता मोहीम राबवून रिक्षावाले व कामगारांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करावी. सरकारने येत्या अधिवेशनात रिक्षा, कष्टकरी जनतेला न्याय द्यावा. या आधीही रिक्षा बंदची हाक रिक्षाचालकांनी दिली होती. मात्र, यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. -डॉ. केशव क्षीरसागर

Web Title: Rickshaw unions in Pune call for agitation on 25th October 50 to 60 thousand rickshaw pullers participated in the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.