हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराला पुणे वाहतूक पोलिसांनी केला १२ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:37 AM2019-05-20T09:37:22+5:302019-05-20T09:55:10+5:30
वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकीचालकाकडून वाहतूक विभागाच्यावतीने चक्क 12हजार 400 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकीस्वाराने तब्बल 25 वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन केले होते.
पुणे : वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकीचालकाकडून वाहतूक विभागाच्यावतीने चक्क 12हजार 400 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकीस्वाराने तब्बल 25 वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन केले होते. मात्र एवढ्या मोठ्या स्वरुपातील दंड भरल्यानंतर संबंधित वाहनचालकाला चांगलीच अद्द्ल घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक प्रशासनाच्यावतीने सुरळीत व शिस्तशीर वाहतूकीसाठी कडक कार्यवाही सुरु केली आहे.
हेल्मेटचा उपयोग न करणे, नो पार्किंग मध्ये वाहन पार्क करणे, सिग्नल तोडणे, सीट बेल्ट न लावणे, लेन ब्रेक करणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. दंड वसूली करत असताना कर्मचा-यांशी वाद घालणा-यांवर देखील शिस्तभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई येत आहे. एकूणच संपूर्ण सुरळीत वाहतूकीकरिता प्रशासनाने जोरदार कारवाईला सुरुवात केली असून दुसरीकडे पुणेकरांनी ही दंडवसूलीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात प्रामुख्याने सध्या हेल्मेटसक्तीची कारवाई आता सीसीटीव्हीव्दारे होत असून प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेला दंड वसूल करण्याकरिता मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस क र्मचारी दंड वसूलीसाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून हेल्मेट परिधान न करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे.