वरंध घाटात दरड कोसळली

By admin | Published: June 24, 2017 05:49 AM2017-06-24T05:49:22+5:302017-06-24T05:49:22+5:30

महाड-भोर रस्त्यावरील वरंध घाटातील उंबार्डेवाडी येथे दरड पडल्याने भोर येथून कोकणाकडे जाणारी व महाड येथून भोरकडे येणारी वाहतूक सुमारे ६ तास ठप्प होती

The rift in the squares collapsed | वरंध घाटात दरड कोसळली

वरंध घाटात दरड कोसळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : महाड-भोर रस्त्यावरील वरंध घाटातील उंबार्डेवाडी येथे दरड पडल्याने भोर येथून कोकणाकडे जाणारी व महाड येथून भोरकडे येणारी वाहतूक सुमारे ६ तास ठप्प होती. यामुळे प्रवाशांचे व पर्यटकांचे अतोनात हाल झाले.
सुमारे ३ तासांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेल्या दरडीची दगडमाती काढली. मात्र, रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड जेसीबीलाही निघत नसल्यामुळे ब्लास्टिंग मागवले असून, दगड फोडून बाजूला केल्यावरच वाहतूक सुरळीत होईल.
दुचाकी आणि लहान गाड्यांची वाहतूक सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. वाहतूक महाबळेश्वर व ताम्हणीमार्गे वळविण्यात आली आहे.
भोरपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोर-महाड रस्त्यावरील उंबार्डेवाडी येथील डोंगरातील मोठमोठे दगड, माती खाली येऊन संपूर्ण रस्ता दुपारी १२ नंतर बंद झाला होता. यामुळे महाडकडून भोरला येणारी व भोरकडून महाडकडे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर, पुण्याहून महाडला जाणाऱ्या ७ एसटी बस अडकल्या असून महाडहून भोर-पुण्याकडे येणाऱ्या गाड्या अन्य मार्गाने गेल्या.
याशिवाय भाजीपाला, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या व फिरायला जाणारे पर्यटक यांच्या गाड्या दुपारपासूनच अडकल्याने रस्त्यावर दोन-तीन किलोमीटरपर्र्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक गाड्या परत फिरून महाडकडे निघून गेल्या.
वरंध घाटात दुपारी १२ ते १ दरम्यान दरड कोसळल्यानंतर सुमारे ३ तासांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने भोर येथून घटनास्थळावर जेसीपीच्या मदतीने रस्त्यावरील दगडगोटे, माती बाहेर काढून संपूर्ण रस्ता खुला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.
मात्र, रस्त्यावर पडलेला एक
मोठा दगड जेसीबीला निघत
नसल्याने ब्लास्टिंग करून दगड फोडून वाहतूक सुरळीत करावी लागणार आहे. त्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: The rift in the squares collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.