सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:28 AM2018-07-14T10:28:36+5:302018-07-14T10:29:31+5:30

पर्यटकांसाठी गडावर जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला होता़ 

A rift struck again on the Sinhagad Ghat road | सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

Next

पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर शनिवारी पहाटे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी दरड कोसळली़ त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे़ गेल्या रविवारी पहाटेच्या सुमारास उंबरदांड पॉइंटवर मोठी दरड कोसळली होती. तेव्हापासून पर्यटकांसाठी गडावर जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला होता़ 

याबाबत वन विभागाचे अधिकारी महेश भालेराव यांनी सांगितले की, गेल्या रविवारी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती़ त्याच ठिकाणी आज पहाटे पुन्हा दरड कोसळली आहे.  सिंहगड घाट रस्त्यावर पायथ्यापासून आठ किलोमीटरवर उंबरदांड दरड पॉइंट आहे़ तेथून वर गड एक किलोमीटर राहतो़ गेल्या काही दिवसांपासून सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे़ गेल्या रविवारी पहाटे दरड कोसळली़ सर्व राडारोडा रस्त्यावर आला़ तो हटविण्याचे काम वन विभागाकडून केले जात होते़ त्यामुळे गेल्या एक आठवड्यापासून रस्ता बंद होता़ येथील राडारोडा काढण्याचे काम दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. सुरक्षेसाठी अजून पर्यटकांच्या वाहनांना गडावर जाण्यास बंदी करण्यात आली होती.

पावसाचा अंदाज घेऊन हा रस्ता सुरु करण्याचा वन विभागाचा विचार होता. असे असतानाच आज पुन्हा त्याच जागी रात्री पुन्हा दरड कोसळली़ सर्व राडारोडा रस्त्यावर आल्याने तो पुन्हा बंद झाला आहे़ आता हा रस्ता पुन्हा कधी सुरु होईल हे सांगणे सध्या अवघड आहे़

Web Title: A rift struck again on the Sinhagad Ghat road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.