केळद खिंडीजवळ दरड कोसळली

By Admin | Published: July 9, 2015 02:08 AM2015-07-09T02:08:28+5:302015-07-09T02:08:28+5:30

वेल्ह्याहून, पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणच्या केळद खिंडीजवळ सायंकाळी ५.२० च्या सुमारास दरड कोसळली.

The rift struck near the Kellad valley | केळद खिंडीजवळ दरड कोसळली

केळद खिंडीजवळ दरड कोसळली

googlenewsNext

कापूरव्होळ : वेल्ह्याहून, पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणच्या केळद खिंडीजवळ सायंकाळी ५.२० च्या सुमारास दरड कोसळली. या दरडीमुळे पासली परिसर व केळद पंचक्रोशी परिसरातील असणाऱ्या १६ गावांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. आज सकाळच्या शाळा असल्याने विद्यार्थी तसेच पालक बचावले. आज दुपारी वेल्ह्यातील पर्यटनक्षेत्र असलेल्या मढी घाटात निघालेले प्रवासी यातून बचावले. वेल्ह्यातून बाजार व साहित्य घेऊन केळद व त्याहून पुढे असणाऱ्या गावातील लोक आज सायंकाळी ६ वाजता वेल्ह्यातून घरी परतत असताना, या दरडीमुळे त्यांना घरी जाता आले नाही. सिंगापूरला जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केलेला असून, या रस्त्याचे मोठमोठाले दगड, माती, मुरूम या खिंडीच्या रस्त्याच्या लगत बेजबाबदारपणे टाकून पावसाळ्यात काय होईल, याचा विचार केला नाही. वेल्ह्यात आज दिवसभर प्रचंड मुसळधार पावसामुळे या खिंडीच्या लगतचे दगड, माती, मुरूम रस्त्यावर येऊन उकरलेले दगड, रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली.
याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, की या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवून जेसीबीच्या साह्याने हा रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.
(वार्ताहर)

Web Title: The rift struck near the Kellad valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.