रास्त भाव धान्य दुकानदारांचा बंद मागे
By Admin | Published: August 12, 2016 01:00 AM2016-08-12T01:00:12+5:302016-08-12T01:00:12+5:30
महाराष्ट्रातील रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तमिळनाडूच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करण्याबाबत आगामी अधिवेशनात प्रस्ताव सादर करू
पिंपरी : महाराष्ट्रातील रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तमिळनाडूच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करण्याबाबत आगामी अधिवेशनात प्रस्ताव सादर करू, केंद्र सरकारकडून आलेल्या अनुदानाच्या फरकातील रक्कम व वाहतूक फरकाची रक्कम जिल्हानिहाय तपासून त्वरित देण्याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन अन्नधान्य पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने बंद तात्पुरता स्थगित केला आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाबर म्हणाले, ‘‘आगामी काळातील सण, उत्सवामध्ये नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून बंद तात्पुरता स्थगित करीत आहोत. बुधवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत फेडरेशनच्या वतीने केलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार २०११ पर्यंतची कालावधीतील वाहतूक फरकाची रक्कम मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे. असोसिएशनचे
विजय गुप्ता, शहाजी लोखंडे, परेश नाणेकर, विक्रम छाजेड, लक्ष्मण उकीरंडे, शंकर आतकरे, मोहनलाल चौधरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)