आत्महत्येपेक्षा घटस्फोटाचा मार्ग योग्य
By Admin | Published: May 12, 2014 03:17 AM2014-05-12T03:17:27+5:302014-05-12T03:17:27+5:30
पती-पत्नीच्या नात्यातील भांडणे-तणाव किंवा जाच यामुळे हत्या किंवा आत्महत्या होण्यापेक्षा न्यायालयात घटस्फोटाच्या तक्रारी येणे योग्य आहे.
पुणे : पती-पत्नीच्या नात्यातील भांडणे-तणाव किंवा जाच यामुळे हत्या किंवा आत्महत्या होण्यापेक्षा न्यायालयात घटस्फोटाच्या तक्रारी येणे योग्य आहे. कायद्याची माहिती होऊन आपल्याविरुद्ध होणार्या अन्यायासाठी दाद मागणे हे मृत्यूचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा केव्हाही चांगले, असे मत उच्च न्यायालयाचे व औरंगाबद खंडपीठाचे न्यायमूर्ती मदन जोशी यांनी व्यक्त केले. मराठवाडा मित्रमंडळचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय संचलित कौटुंबिक समस्या निवारण व सल्ला केंद्राच्या वतीने कौटुंबिक समस्यांशी निगडित कार्यशाळेचे उद्घाटन न्या. जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, न्यायाधीश व्ही. व्ही. शहापूरकर, बी. जी. जाधव, पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे, क्रांती देशमुख उपस्थित होत्या. या वेळी डॉ. विजया वांजपे, डॉ. राजेंद्र शिंपी, डॉ. उल्हास लुकतुके यांनी या वेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)