पुण्यातील रिंगरोड होणार चार वर्षांत पूर्ण; शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:06 AM2022-12-22T11:06:00+5:302022-12-22T11:07:13+5:30

हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे देसाई यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले....

Ring road in Pune will be completed in four years; Information of Shambhuraj Desai in the Legislative Assembly | पुण्यातील रिंगरोड होणार चार वर्षांत पूर्ण; शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती

पुण्यातील रिंगरोड होणार चार वर्षांत पूर्ण; शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती

Next

पुणे : जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडचे काम प्रगतिपथावर असून, भूसंपादनाचे काम सुरू आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून, या रिंगरोडचे काम ३० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार आहे. हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर देसाई म्हणाले, ‘संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोड पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम भागातील रिंगरोडबाबत फेब्रुवारी २०२३ मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच सुरू केला जाईल. यासाठी जमिनीचा मोबदला दुप्पट केला आहे. या रिंगरोडचे काम ३० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल.’

Web Title: Ring road in Pune will be completed in four years; Information of Shambhuraj Desai in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.