रिंगरोड अद्यापही हवेतच

By admin | Published: April 30, 2015 11:58 PM2015-04-30T23:58:39+5:302015-04-30T23:58:39+5:30

शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रिंगरोडचा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ringers should still be there | रिंगरोड अद्यापही हवेतच

रिंगरोड अद्यापही हवेतच

Next

पुणे : शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रिंगरोडचा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, यासाठी लागणारा तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे अद्यापही रिंग रोड हवेतच आहे.
प्रशासनामार्फत सन २००७ मध्ये प्रथम रिंगरोडच्या रस्त्यांची आखणी करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षे यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आणि सन २००९ मध्ये शहराभोवतालच्या सुमारे १७० किलोमीटरचा रिंग रोड करण्याचे निश्चित करण्यात आले. या रस्त्यासाठी त्या वेळच्या दरपत्रकानुसार (डीएसआर) सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. या रिंग रोडसाठी सुमारे सहा हजार एकर जमीन संपादित करावी लागणार असून, सर्वाधिक खर्च भूसंपादनासाठीच द्यावा लागणार आहे. हा रिंग रोड सहापदरी असणार असून, यामध्ये चारचाकी वाहने, पादचारी, सायकल ट्रॅक यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता या रिंग रोडमध्येच मेट्रो रेल्वे आणि बीआरटीसाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे.
दरम्यान, रिंगरोडची हद्द आणि पीएमआरडीएची हद्द जवळजवळ सारखीच आहे. त्यामुळे रिंगरोड प्रकल्पाची अंमलबजावणी पीएमआरडीएमार्फत होणार असल्याची चर्चा आहे. रिंगरोडमुळे पीएमआरडीएच्या हद्दी असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोमेंट यांच्याबरोबर लोणावळा, तळेगाव, शिरूर, भोर, सासवड आणि दौंड नगरपालिका यांच्या एकत्रित विकासाला चालना मिळेल.

शहरावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने या रिंग रोडची आखणी करण्यात आली आहे. सध्या रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. अमेरिकेची एईकॉम एशिया लिमिटेड ही कंपनी सर्वेक्षणाचे काम करीत असून, प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये गेल्या दहा वर्षांत रिंग रोडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रिंग रोडची हद्द वाढविण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने रिंग रोडची हद्द निश्चित होणार आहे.

Web Title: Ringers should still be there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.