Gram Panchayat: शिक्रापुरच्या ग्रामपंचायत सभेत कचरा प्रश्नावरून गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:09 PM2021-10-20T20:09:43+5:302021-10-20T20:09:53+5:30

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे ग्रामपंचायतची ग्रामसभा कोरोना काळानंतर दोन वर्षांनी झाली. त्यात कचरा प्रश्नावर वादळी चर्चा झाली

Riot over waste issue at shikrapur gram panchayat meeting | Gram Panchayat: शिक्रापुरच्या ग्रामपंचायत सभेत कचरा प्रश्नावरून गदारोळ

Gram Panchayat: शिक्रापुरच्या ग्रामपंचायत सभेत कचरा प्रश्नावरून गदारोळ

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दोन्ही गट आपापल्या मतांवर ठाम होते

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे ग्रामपंचायतची ग्रामसभा कोरोना काळानंतर दोन वर्षांनी झाली. त्यात कचरा प्रश्नावर वादळी चर्चा झाली. परंतु अखेर पर्यंत कचरा प्रश्नांवर ठोस निर्णय होऊ शकला नाही.

शिक्रापूर ता. शिरूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पहिली ग्रामसभा झाली. गेले अनेक दिवस गाजत असलेला कचरा प्रश्नावर निर्णय आज ग्रामसभेत होणार असल्याने सर्वांचे लक्ष या ग्रामसभेकडे लागलेले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांच्या गटामध्ये गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी गोंधळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दोन्ही गट आपापल्या मतांवर ठाम होते. सरपंच गट कचरा प्रकल्प सध्याच्या जागेवर करण्यावर ठाम तर उपसरपंच गट कचरा प्रकल्प नवीन जागा पाहून त्या ठिकाणी करण्यावर ठाम होता.

काही केल्या दोन्ही गटांचे ठोस निर्णय होत नव्हते. दोन ते तीन वेळा ग्रामस्थांनी ग्रामसभेतून उठून आरडाओरडा देखील केला. यावेळी मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शांततेचे आवाहन केले. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच रमेश थोरात, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, विशाल खरपुडे, प्रकाश वाबळे, कृष्णा सासवडे, सुभाष खैरे, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, सीमा लांडे, वंदना भुजबळ, मोहिनी युवराज मांढरे, सारिका सासवडे, मोहिनी संतोष मांढरे, शालन राउत, उषा राउत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोरक्ष सासवडे, कृषी सहाय्यक अशोक जाधव, मुख्याध्यापक दत्तात्रय तांबे, सुभाष पाचकर, ग्रामीण रुग्णालयचे बाबुराव कर्डिले, नवनाथ सासवडे,व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. 

एक महिन्यात कचरा प्रकल्प साठी जागा उपलब्ध न झाल्यास आता आहे. त्या ठिकाणी कचरा प्रकल्प शेडचे काम सुरु करण्यात येईल. असा निर्णय दिल्या नंतर कचरा प्रश्नांवर निर्णय होत ग्रामसभा संपल्याची घोषणा करण्यात आला.

Web Title: Riot over waste issue at shikrapur gram panchayat meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.