हुल्लडबाजी, मारहाण यामुळे व्यापारात झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:16+5:302021-03-26T04:12:16+5:30

राजगुरुनगर: खेड बाजार समितीच्या आवारात भाजीपाला व्यापारात शेतकरी, व्यापारी यांना स्थानिक हुल्लडबाजांकडून दमबाजी, प्रसंगी मारहाण केल्याचा घटना ...

Riots and beatings led to a decline in trade | हुल्लडबाजी, मारहाण यामुळे व्यापारात झाली घट

हुल्लडबाजी, मारहाण यामुळे व्यापारात झाली घट

Next

राजगुरुनगर: खेड बाजार समितीच्या आवारात भाजीपाला व्यापारात शेतकरी, व्यापारी यांना स्थानिक हुल्लडबाजांकडून दमबाजी, प्रसंगी मारहाण केल्याचा घटना घडल्या आहेत. परिणामी या व्यापारात मोठी घट झाली आहे. पुणे, पनवेल, वाशी, मुंबईकडील चांगले व्यापारी येथे येत नाहीत. दहशत निर्माण करणाऱ्याची दादागिरी यापुढे मोडून काढली जाईल, असा इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला.

राजगुरूनगर बाजार समितीच्या येथील सभागृहात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. यावेळी आमदार मोहिते बोलत होते. सर्वसाधारण सभा सभापती विनायक घुमटकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल -मापाडी प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करताना आमदार मोहिते पाटील बोलत होते.

जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, बाजार समितीचे उपसभापती धारू गवारी, माजी सभापती विलास कतोरे, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, बाळशेठ ठाकूर, अशोक राक्षे, संचालक सुरेखा टोपे, सुगंधा शिंदे, पांडुरंग बनकर, रेवन थिगळे,सयाजी मोहिते, लक्ष्मण टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे,रमेश राळे,सिद्धेश्वर सोसायटीचे अध्यक्ष खंडेराव थिगळे,तिन्हेवाडी विकास सोसायटी अध्यक्ष भास्कर जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.

खेड विमानतळासाठी राज्य सरकार सकारात्मक आमदार दिलीप मोहिते पाटील यांची माहिती लोहगावचा विमानतळ लष्करी असल्याने त्यावर मर्यादा येतात. म्हणून पुण्याला नजीक असलेल्या खेड तालुक्यातील सेझच्या जागेत मर्यादित क्षमतेचा विमानतळ करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडलेल्या या प्रस्तावावर सरकार सकारात्मक आहे.खेडमध्ये लवकरच विमानतळ होण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू होईल अशी माहिती आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी स्पष्ट केली.

सभापती विनायक घुमटकर यांनी प्रास्ताविक, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती धारु गवारी यांनी आभार मानले

--

फोटो ओळी : २५ राजगुरुनगर कृषी उत्पन समिती सभा

फोटो क्रमांक फोटो ओळ. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत उपस्थित आमदार दिलीप मोहिते पाटील, सभापती विनायक घुमटकर संचालक.

Web Title: Riots and beatings led to a decline in trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.