पुण्याच्या बाजारपेठेत भेंडीच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:44 AM2018-10-17T11:44:09+5:302018-10-17T11:44:28+5:30
फळे,भाजीपाला :पुणे येथील बाजारपेठेत कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, हिरव्या मिरचीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
पुणे येथील बाजारपेठेत कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, हिरव्या मिरचीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी कांद्याला क्विंटलला ५०० ते ११०० रुपये भाव मिळाला होता. मात्र, मंगळवारी कांद्याला ८०० ते १८०० रुपये दर मिळाला. तसेच बटाट्याला १४०० ते २२००, लसणाला ८०० ते २६०० रुपये दर मिळाला.
त्याचप्रमाणे भेंडीला २००० ते ३५००, टोमॅटोला ५०० ते ९०० रुपये आणि हिरव्या मिरचीला १४०० ते २५०० रुपये भाव मिळाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर गुलटेकडी येथील फूल बाजारात मंगळवारी ७३ हजार ९८९ किलो आवक झाली. चांगल्या दर्जाच्या झेंडूला ४० ते ५० रुपये आणि कमी दर्जाच्या झेंडूला १० ते २० रुपये भाव मिळाला. बाजारात पांढऱ्या शेवंतीची १५ हजार ७६७ किलो आवक झाली. पांढऱ्या शेवंतीला ४० ते ६० रुपये आणि पिवळ्या शेवंतीला १० ते २० रुपये किलो भाव मिळाला, असे फूल व्यापाऱ्यांनी सांगितले.