गृहकर्जाचे वाढते दर ही मोठी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:32+5:302021-04-08T04:12:32+5:30

पुणे : गृहकर्जामध्ये एसबीआयसह विविध बँकांनी केलेली वाढ चिंताजनक असून कोरोनामुळे संकटाचा सामना करणारे बांधकाम क्षेत्र यामुळे आणखी कमकुवत ...

Rising mortgage rates are a big problem | गृहकर्जाचे वाढते दर ही मोठी समस्या

गृहकर्जाचे वाढते दर ही मोठी समस्या

Next

पुणे : गृहकर्जामध्ये एसबीआयसह विविध बँकांनी केलेली वाढ चिंताजनक असून कोरोनामुळे संकटाचा सामना करणारे बांधकाम क्षेत्र यामुळे आणखी कमकुवत होईल, अशी भीती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी व्यक्त केली.

याबाबत फरांदे म्हणाले, मागील वर्षी गृहकर्जाचे कमी झालेले व्याज दर आणि मुद्रांक शुल्कात मिळत असलेली सवलत यामुळे बांधकाम क्षेत्राला उभारी मिळेल, अशी आशा होती. परंतु, आता गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने या क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्राशी इतर किमान २५० व्यवसाय आणि लाखो कामगारांचे भविष्य निगडित असल्याने याचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोरोना काळात बांधकाम विकसकांसमोर त्यांचे नियोजित प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्याकरिता कामगारांची आवश्यकता आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मजुरांचे होत असलेले स्थलांतर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. वर्षभराच्या परिस्थितीनंतर बांधकाम क्षेत्र पुन्हा उभे राहत असताना टाळेबंदीच्या भीतीने अनेक मजूर शहर सोडून जात आहेत. त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असून बांधकामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व आरोग्याची काळजी घेतली जात आहे. मजुरांच्या स्थलांतराने सध्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे फरांदे यांनी नमूद केले.

---/---

लसीकरण मोहीम राबविणार

क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड सोबतच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. लाखो मजुरांना लस दिली जाणार आहे.

Web Title: Rising mortgage rates are a big problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.