ओतूर बाजारात कांद्याच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:44+5:302021-09-24T04:13:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी ३६ हजार २४५ कांदा ...

Rising onion prices in Ootur market | ओतूर बाजारात कांद्याच्या भावात वाढ

ओतूर बाजारात कांद्याच्या भावात वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी ३६ हजार २४५ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारीनुसार नं १ गोळा कांद्यास १० किलोस २२० रुपये ते २५५ रुपये भाव मिळाला बाजारभावात थोडी वाढ झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

प्रतवारीनुसार कांद्याला मिळालेले भाव :

कांदा नं. १ गोळा २२० ते २५५ रुपये, सुपर कांदा १८० ते २४० रुपये, कांदा नं.२ गोल्टा १४० ते १८० रुपये, कांदा नं ३ गोलटी / बदला- ५० ते १५० रुपये.

बटाटा बाजार

गुरुवारी १५२ बटाटा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस ५० रुपये ते १४५ भाव मिळाला, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

Web Title: Rising onion prices in Ootur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.