फळभाज्यांची आवक वाढूनही भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:53+5:302021-09-27T04:10:53+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची मोठी आवक होऊनही भावात चांगलीच वाढ झाली. जळगाव भुईमूग शेंगाची काहीही आवक झाली नाही, तर लसणाची आवक वाढूनही भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची आवक घटली तर पितृ पंधरवडा असल्याने टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, वांगी, भेंडी, कारली, ढोबळी मिरची, गावर, काकडी फळभाज्यांची आवक वाढूनही बाजारभावात वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू भाजीची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल दोन कोटी ५० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ६०० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत २०० क्विंटलने कमी झाल्याने भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा भाव १७०० स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक दोन हजार ६०० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक एक हजार ७०० क्विंटलने वाढूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचे बाजारभाव एक हजार ५०० रुपयांवर पोहोचले. लसणाची एकूण आवक २० क्विंटल होऊनही लसणाला आठ हजार रुपये बाजारभाव मिळाला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १५८ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला एक हजार ते तीन हजार रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –
कांदा - एकूण आवक - ६०० क्विंटल. भाव क्रमांक १. एक हजार ७०० रुपये, भाव क्रमांक २. एक हजार ३०० रुपये, भाव क्रमांक ३. एक हजार रुपये.
बटाटा - एकूण आवक - दोन हजार ६०० क्विंटल. भाव क्रमांक १. एक हजार ५०० रुपये, भाव क्रमांक २. एक हजार २०० रुपये, भाव क्रमांक ३. एक हजार रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
टोमॅटो - १६९ पेट्या ( एक हजार ते एक हजार ६०० रु. ), कोबी - १७१ पोती (३०० ते ५०० रु. ), फ्लॉवर - १५३ पोती ( एक हजार ते तीन हजार रु.), वांगी - ८६ पोती (दोन हजार ते तीन हजार रु.), भेंडी - ६० पोती (तीन हजार ते चार हजार रु.), दोडका - ३९ पोती (दोन हजार ते चार हजार रु.), कारली - ६४ डाग ( दोन हजार ते चार हजार रु.), दुधीभोपळा - ५४ पोती (५०० ते एक हजार ५०० रु.), काकडी - ४४ पोती ( ५०० ते एक हजार ५०० रु.), फरशी - ३४ पोती (तीन हजार ते चार हजार रु.), वालवड - २० पोती (तीन हजार ते चार हजार रु.), गवार - २० पोती (चार हजार ते सहा हजार रु.), ढोबळी मिरची - ६३ डाग (एक हजार ते तीन हजार रु.), चवळी - १४ पोती (एक हजार ते दोन हजार रुपये), वाटाणा - ४३ पोती (सहा हजार ते आठ हजार रुपये), शेवगा - ९ पोती (तीन हजार ते पाच हजार रुपये), गाजर - १३ पोती (एक हजार ते दोन हजार रु.).
पालेभाज्या –
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १३ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला एक हजार २०० ते तीन हजार रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची १७ हजार जुड्यांची आवक होऊन प्रती शेकडा जुड्यांना ५०१ ते एक हजार ८०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची ७ हजार जुड्यांची आवक होऊन प्रती शेकडा ५०० ते एक हजार ३०० रुपये भाव मिळाला. पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
मेथी - एकूण ८ हजार ५०० जुड्या (एक हजार ५०० ते दोन हजार ५०० रुपये), कोथिंबीर - एकूण १२ हजार ६०० जुड्या (एक हजार ते दोन हजार रुपये), शेपू - एकूण ३ हजार ५०० जुड्या (४०० ते ८०० रुपये), पालक - एकूण २ हजार १० जुड्या (३०० ते ६०० रुपये).
जनावरे -
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६५ जर्शी गायींपैकी ४२ गायींची विक्री झाली (१० हजार ते ५० हजार रुपये ), २१० बैलांपैकी १४० बैलांची विक्री झाली (१० हजार ते ३० हजार रुपये), १०५ म्हशींपैकी ८५ म्हशींची विक्री झाली (२० हजार ते ६० हजार रुपये), पाच हजार ८४० शेळ्या-मेंढ्यांपैकी पाच हजार ५२० मेंढ्यांची विक्री झाली (दोन हजार ते १५ हजार रुपये.)
२६ चाकण
चाकण बाजारात काकडीची आवक झाली.
260921\img-20210925-wa0002.jpg
चाकण बाजारात काकडीची आवक झाली.