आवक घटल्याने फळभाज्यांच्या भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:12+5:302021-08-23T04:13:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. कांदा, बटाटा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. कांदा, बटाटा आणि लसूण वगळता इतर सर्वच फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे, अशी माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
गेल्या आठवड्यात फळभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी होती. दरामध्ये घसरण झाली होती. तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठिकठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे माल काढण्यास अडचणी येत होत्या म्हणून आवक घटली होती. परिणामी भावात वाढ झाली होती.
रविवारी मार्केट यार्डात ८० ते ९० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये मध्य प्रदेशातून ५ ते ६ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र
प्रदेश आणि तमिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटकातून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, गुजरात आणि राज्याच्या स्थानिक भागामधून बटाट्याची ४० ट्रक इतकी आवक झाली आहे.
स्थानिक भागातील आवकेमध्ये सातारी आले ७०० ते८०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, प्लॉवर ७ ते ८ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते
१२ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, पुरंदर, पारनेर वाई आणि साताऱ्याहून मटार ५०० ते ६०० गोणी,
भुईमूग शेंग १ हजार पोती, कांदा ६० ते ६५ ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १५०-१९०, बटाटा : १००-१३०, लसून : ३००-
८००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : १००-२००, गवार :१००-२००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : १००-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : १५०- १८०, काकडी : ८०-१४०, कारली हिरवी १००-१५०, पांढरी ८०-१००, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, प्लॉवर : १००-१४०, कोबी : ७०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल: ८०-१००, ढोबळी मिरची: १००-१५०, तोंडली : कळी २००-२२०, जाड, ९०-१००, शेवगा : ४००-४५०, गाजर २००-२५०, वालवर २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००- २५०, घोसावळे : १००-१५०, ढेमसे: १५०-२००, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार : स्थानिक: ६००-७००, पावटा : २००-३००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, नारळ : शेकडा १०००-१६००, मका कणीस : ५०-१००.