खरबूज, पपई, कलिंगड, डाळिंबाच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:12+5:302021-07-26T04:09:12+5:30

पुणे : मार्केट यार्डात कलिंगड, खरबूज, पपई आणि डाळिंबाच्या भावात वाढ झाली आहे. कलिंगडाच्या भावात किलोमागे दहा रुपये, तर ...

Rising prices of melon, papaya, watermelon and pomegranate | खरबूज, पपई, कलिंगड, डाळिंबाच्या भावात वाढ

खरबूज, पपई, कलिंगड, डाळिंबाच्या भावात वाढ

Next

पुणे : मार्केट यार्डात कलिंगड, खरबूज, पपई आणि डाळिंबाच्या भावात वाढ झाली आहे. कलिंगडाच्या भावात किलोमागे दहा रुपये, तर खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. चिक्कू, पेरु आणि लिंबाच्या भावात मात्र घट झाली आहे. संत्रा, मोसंबी, अननस आणि सीताफळाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

खरबूज आणि कलिंगडाच्या आवकेमध्ये पावसामुळे मोठी घट झाली आहे. प्रत्येकी एक ते दोन टेम्पोची आवक झाली आहे. कलिंगडाच्या भावात किलोमागे दहा रुपये, तर खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पपईची आवक सरासरी इतकी झाली आहे. मागणी चांगली असल्याने भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे़, तर डाळींबाच्या भावामध्येही दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लिंबांंची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आषाढ महिना असूनही पावसामुळे लिंबांना मागणी कमी असल्याने भावात गोणीमागे वीस ते तीस रुपयांनी घट झाली आहे. तर चिक्कुला मागणी कमी असल्याने गोणीमागे शंभर रुपयये आणि पेरुच्या भावात वीस किलो मागे शंभर रुपयांनी घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी

सांगितले.

केरळ येथून अननस १ ट्रक, संत्री १ टन, डाळिंब ४० ते ५० टन, मोसंबी २५ ते ३० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ५०० के्रट, चिक्कू ५०० बॉक्स खरबुजाची १ ते २ टेम्पो इतकी आवक झाली.

अननसाची आवक केरळहून होते. मात्र, पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद असल्याने केरळहून होणारी अननसाची आवक थांबली आहे. अवघी एक गाडीची रविवारी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :

लिंबे (प्रति गोणी) : ६०-२००, कलिंगड : १०-१६, खरबूज : १५-२५, संत्रा : (१० किलो) : ३००-९००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १२०-२५०, (४ डझन) : ३० ते ११०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश : १०-२५, आरक्ता २०-५०. पपई : १०-२५, पेरू (२० किलो) : ३००-४००, चिक्कू (१० किलो) : १००-५००.

-------------------------

फोटो : मार्केटयार्डात रविवारी सिताफळाची आवक वाढल्याने भाव स्थिर होते.

Web Title: Rising prices of melon, papaya, watermelon and pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.