भुशी धरणाच्या पायर्‍या वाहून जाण्याचा धोका

By admin | Published: June 25, 2017 08:54 AM2017-06-25T08:54:02+5:302017-06-25T08:54:02+5:30

पर्यटकांची पंढरी म्हणून उल्लेख केला जाणार्‍या भुशी धरणाच्या पायर्‍यांचा काही भाग तुटला असल्याने याठिकाणी पायर्‍या

The risk of carrying the steps of Bhushi dam | भुशी धरणाच्या पायर्‍या वाहून जाण्याचा धोका

भुशी धरणाच्या पायर्‍या वाहून जाण्याचा धोका

Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 25 - पर्यटकांची पंढरी म्हणून उल्लेख केला जाणार्‍या भुशी धरणाच्या पायर्‍यांचा काही भाग तुटला असल्याने याठिकाणी पायर्‍या वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
    लोणावळ्याचे भुशी धरण हे पावसाळी पर्यटनाचे मुख्य ठिकाण आहे. राज्याच्या विविध भागातून येणारे पर्यटक धरणाच्या सांडव्यावरुन वाहणार्‍या पाण्यात चिंब भिजण्यासाठी या पायर्‍यांवर बसतात. पाण्याचा प्रवाह व ऊन्हामुळे झालेली धूप यामुळे धरणाच्या पायर्‍यांचा खालचा भाग मोठ्या प्रमाणात तुटला आहे. तसेच काही पायर्‍यांचे दगड गायब झालेले असल्याने धरणाच्या पायर्‍या येत्या पावसात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
     मध्य रेल्वेची मालकी असलेल्या या भुशी धरणात बुडून पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी सांडव्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने काटेतारेचे कुंपण लावण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी पर्यटन आराखड्यानुसार जीवरक्षक नेमण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने धरणाच्या पायर्‍याची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे. अन्यथा यावर्षी अनेक पायर्‍या पाण्यात वाहून जाऊ शकतात.

Web Title: The risk of carrying the steps of Bhushi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.