पीएमपीच्या सुधारणेला खीळ बसण्याचा धोका

By Admin | Published: April 2, 2015 05:51 AM2015-04-02T05:51:12+5:302015-04-02T05:51:12+5:30

प्रशासन व व्यवस्थापनातील ढिलाईमुळे कोट्यावधी रुपयांच्या बोजाखाली अडकून खिळखिळ््या झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला सुधारणांच्या

The risk of the disruption of PMP's reform | पीएमपीच्या सुधारणेला खीळ बसण्याचा धोका

पीएमपीच्या सुधारणेला खीळ बसण्याचा धोका

googlenewsNext

पुणे : प्रशासन व व्यवस्थापनातील ढिलाईमुळे कोट्यावधी रुपयांच्या बोजाखाली अडकून खिळखिळ््या झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला सुधारणांच्या मार्गावर आणण्याचे काम डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले. मात्र केवळ साडे तीन महिन्यांत त्यांची बदली झाल्याने या सुधारणांना पुन्हा खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘पीएमपी’चे रुपडे पालटत असताना डॉ. परदेशी यांची बदली झाल्याने पीएमपीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
दररोज सुमारे बारा लाख प्रवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी पीएमपी बससेवा मागील काही वर्षांत कोलमडून गेली होती. ताफ्यातील एकुण बसपैकी ५० टक्के बसही दुरुस्तीअभावी मार्गावर येत नव्हत्या. त्यामुळे रोजचा आर्थिक तोटा वाढतच चालला होता. दिवसेंदिवस डबघाईला आलेल्या पीएमपीला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने डिसेंबर महिन्यात डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारख्या कार्यक्षम आएएस अधिकाऱ्याची नेमणुक केली. त्यावेळी त्यांच्याकडे मुद्रांक शुल्क महानिरीक्षक पदाचा मुख्य भार होता. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. हे पद स्वीकारल्यापासून त्यांनी पीएमपीमध्ये सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली. मागील तीन महिन्यांत त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे पीएमपी आता कुठे मार्गावर ेयेवू लागली होती.
परदेशी यांनी धडाकेबाज निर्णय घेत सर्व बसगाड्या रस्त्यांवर आणण्याचा निर्णय घेत त्या येत नाही तोवर वेतन रोखण्याचा निर्णय घेतला. कसलाही गाजावाजा न करता स्वत: बसने ़प्रवास करुन प्रवाशांना काय अडचणी येतात त्याचीही पाहणी केली. सुट्ट्या भागांसाठी रोजच्या उत्पन्नातील ६ टक्के हिस्सा राखुन ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय त्यांनी घेतला. तज्ज्ञ सल्लागारांची नेमणुक, वेळापत्रकामध्ये सुधारणा, कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी उगारलेला कारवाईचा बडगा, बसेसची रंगरंगोटी, नवीन फलक अशा अनेक सुधारणांचे काम त्यांनी हाती घेतले होते. त्यातून सकारात्मक बदलही जाणवत होते. पीएमपीच्या सुधारणेसाठी त्यांनी दीर्घकालीन कृती आराखडा तयार केला. मात्र आता त्यांची बदली झाल्याने सुधारणांना अडथळा होण्याची शक्यता आहे.

Web Title: The risk of the disruption of PMP's reform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.