जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका होतोय कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:12 AM2021-07-07T04:12:59+5:302021-07-07T04:12:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका हळूहळू कमी होत असून, नव्याने रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका हळूहळू कमी होत असून, नव्याने रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळेच दर आठवड्याला ८०-९० रुग्ण वाढत असताना मागील आठवड्यात जिल्ह्यातील केवळ ४५ नवीन म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढ झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटते मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्स, स्टेराॅईड आणि ऑक्सिजनच्या चुकीच्या पद्धतीने व अतिरेक वापर केल्याने रुग्णांवर अनेक दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. याचाच एक भाग म्हणजे म्युकरमायकोसिस हा आजार असून, पोस्ट कोविड रुग्ण या आजाराचे बळी ठरत आहे. म्युकरमायकोसिसमध्ये प्रामुख्याने डोळ्यावरच सर्वाधिक परिणाम होताना दिसत आहेत. एप्रिल २०२१ मध्ये जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली; परंतु थोड्याच दिवसांत यात मोठी वाढ झाली. जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण केले. याचा चांगला परिणाम दिसून आला. या सर्वेक्षणामुळे मे महिन्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली तरी जून महिन्यात दर आठवड्याला संख्या कमी कमी होत गेली.
जिल्ह्यात आतापर्यंत ११९६ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत ५३७ रुग्ण उपचार घेऊन बरे देखील झाले आहेत. तर सध्या ४९० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर म्युकरमायकोसिस आजारामुळे १६९ रुग्णांनी आपला जीव गमवला आहे.