‘लोकमत’चा आर‘ती’चा तास उपक्रमात सहभागी व्हावे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार - मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:55 AM2017-08-21T02:55:53+5:302017-08-21T02:55:53+5:30
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम असो, की पर्यावरणपूरक मखरी बनविणे, ‘स्मार्ट सोसायटी गणेशोत्सव’ स्पर्धा, गणेश मंडळाचे देखावे स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम असो, की पर्यावरणपूरक मखरी बनविणे, ‘स्मार्ट सोसायटी गणेशोत्सव’ स्पर्धा, गणेश मंडळाचे देखावे स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या काही वर्षांत शहरामध्ये एकही प्लॅस्टर आॅफ पॅरिसची गणेशमूर्ती येणार नाही, या दृष्टीने लोकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पुण्याच्या गणेशोत्सवाला स्वतंत्र सामाजिक परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला समाजप्रबोधनाची जोड दिली. समाजप्रबोधनाची हीच कास धरून आता लोकमतने ‘ती’चा गणपती व आर‘ती’चा तास ही अभिनव संकल्पना समोर आणली आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला अधिक बळकटीकरण प्राप्त होईल, असे मत मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपºयातून, देश-विदेशातील लखो लोक दरवर्षी सहभागी होतात. यामध्ये महिलांचे प्रमाणदेखील लक्षणीय असते. यामुळे गणेशोत्सवामध्ये महिलांना जास्तीत जास्त स्वच्छतागृहे आणि सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करणार आहेत. गणेशोत्सवात आठ-दहा तास घराबाहेर पडणाºया महिलांना शहरामध्ये पुरेशी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. या संस्थादेखील शहरामध्ये काही ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीमुळे महिलांची छेडाछाड व दागिनेचोरीचे
प्रकारदेखील खूप घडतात. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून खास महिलांच्या सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त पोलीस कक्ष उभारण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वतीने गणेश मंडळासाठी देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सामाजिक, वैज्ञानिक, पौराणिक व महिला सक्षमीकरण आदी विविध देखावे सादर करणाºया मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. गेल्या सव्वाशे वर्षांपासूनची समाज प्रबोधनाची परंपरा यंदादेखील मंडळ आपल्या देखाव्यांमधून दाखवून देतील. मंडळांचे हे देखावे पाहण्यासाठीच लाखो लोक दरवर्षी गणेशोत्सवात पुण्यात येतात.
गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमामात सोशल नेटवर्किंग तयार होते. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातदेखील गणेशोत्सवामध्ये ‘मॅन टू मॅन’ सोशल नेटवर्किंग अधिक होते. समाजविकासाच्या दृष्टीने सोशल नेटवर्किंग अधिक उपयोगी ठरते. याचा फायदा आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी, रुढी-परंपरांमधून बाहेर पडण्यासाठी करून घ्यायला पाहिजे. ‘गणपती’ची निर्मितीच मुळात ‘ती’ने पार्वतीने केली आहे. त्यामुळे ‘तो’ तीचा आहे. त्यामुळे ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबवित असताना आपल्या परंपरा आणि आधुनिकता याचा मेळ घालून अधिक चांगल्या प्रकारे राबविता येऊ शकतो.
आमच्या घरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीमध्ये मुलगा कुणालसोबत मुलगी चैत्राली हीलादेखील पूजा, आरतीचा मान दिला जातो. पुण्यातील अनेक घरांमध्ये मुलींना आरतीचा मान दिला जातो. परंतु ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘लोकमत’च्या वतीने राबविण्यात येतो.
यंदा एक पुढचे पाऊल टाकत गणेशोत्सवात तिसºया दिवशी (२७ आॅगस्ट) सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आर‘ती’चा तास खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, सोसायट्या आणि घरातील गणपतीची आर‘ती’ महिलांच्या हस्ते करून लोकमतच्या उपक्रमाला पांठिबा द्यावा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.