विधी अभ्यासक्रमाचे अर्ज आजपासून
By admin | Published: March 31, 2017 03:18 AM2017-03-31T03:18:17+5:302017-03-31T03:18:17+5:30
राज्य शासनाच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलतर्फे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक
पुणे : राज्य शासनाच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलतर्फे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विधी अभ्यासक्रमाच्या पाच व तीन वर्षांच्या प्रवेशासाठी अनुक्रमे येत्या २० व २१ मे रोजी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत आॅनलाईन अर्ज भरता येईल.
विद्यार्थ्यांना www.mahacet.org आणि dtepune.gov.in या संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ९ मे रोजी दिले जाईल. तर, परीक्षेचा अंतिम निकाल ३० मे २०१७ रोजी प्रसिद्ध केला जाईल, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)