नदी पुनरुज्जीवन प्रोजेक्ट - एक आभास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:08+5:302021-04-19T04:10:08+5:30
हजारो किलोमीटर प्रवास करून पुण्यातील या नद्यांवर येणारे पक्षी आज दुर्मीळ झाले आहेत. ज्यात विविध प्रकारचे आहेत गोडविट (Godwits ...
हजारो किलोमीटर प्रवास करून पुण्यातील या नद्यांवर येणारे पक्षी आज दुर्मीळ झाले आहेत. ज्यात विविध प्रकारचे आहेत गोडविट (Godwits ), तुतारी (Sandpipers)s , क्रौंच (Cranes), बदकांचे प्रकार इत्यादी. शिवाय स्थानिक पक्षी जे अगदी दशकापूर्वीपर्यंत भरपूर संख्येनं दिसायचे आज ते शोधावे लागतात. पाणकोंबडी(white-breasted waterhen), कवड्या (pied kingfisher), कमलपक्षी (pheasant -tailed Jacana), नदीसुरय (river tern) इत्यादी. ते वाचवावेत यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
जसे सुशोभीकरणाच्या नावाखाली आज आपण नद्या संपवत आहोत. जनतेनं नद्यांना भेटी द्याव्यात, तिथली जैवविविधता समजून घ्यावी, तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. जेव्हा नदीकाठची चौपाटी केली जाते, तेव्हा यातलं काहीच होत नाही. दुरून छान दिसणारी नदी आतून मेलेली असते. तिचे गटार झालेले असते. विविध प्रकल्पांसाठी तिचे पात्र आधीच अरुंद केले आहे. आपल्याला नदी हवी की शासनकर्त्यांनी केलेलं गटार हा निर्णय आपला आहे.
- धर्मराज पाटील, जीवितनदी