रियाझ हेच कलेचे यश : परांजपे

By admin | Published: May 10, 2017 04:22 AM2017-05-10T04:22:56+5:302017-05-10T04:22:56+5:30

गायन आणि वादन कलेत रियाजाला पर्याय नसतो. उलट त्यावरच या क्षेत्रातील यश अवलंबून असते. नामवंत गायकदेखील यातून सुटलेले नाही.

Riyaaz is the art of art: Paranjape | रियाझ हेच कलेचे यश : परांजपे

रियाझ हेच कलेचे यश : परांजपे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गायन आणि वादन कलेत रियाजाला पर्याय नसतो. उलट त्यावरच या क्षेत्रातील यश अवलंबून असते. नामवंत गायकदेखील यातून सुटलेले नाही. नवोदित कलाकारांनी कलेचा अभ्यास करावा, असे आवाहन संगीतकार व सिंथेसायझर वादक विवेक परांजपे यांनी केले.
पुणे आयडॉल-२०१७ गायन स्पर्धेचे उद्घाटन परांजपे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, शिवसेना गटनेते संजय भोसले, नगरसेविका श्वेता चव्हाण, गायक जितेंद्र भुरूक, अमित मुरकुटे, उदय लोखंडे, अशोक मानकर उपस्थित होते. या स्पर्धेतील ९७ स्पर्धकांची प्राथमिक फेरी पं. नेहरूसांस्कृतिक भवन येथे झाली. लिटिल चॅम्प, युवा, जनरल व ओल्ड इज गोल्ड अशा चार गटातील प्राथमिक फेरी झाल्यानंतर ४० स्पर्धकांची निवड १३ मे रोजी बालंगधर्व रंगमंदिर येथे आयोजित अंतिम फेरीसाठी होईल.

Web Title: Riyaaz is the art of art: Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.