‘अनलॉक’नंतर बारामतीत रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:20+5:302021-06-11T04:08:20+5:30
पोलीस प्रशासनाचा पुढाकार: १८० जणांचे अहवाल आले ‘निगेटिव्ह’ बारामती : ‘अनलॉक’च्या दिशेने बारामतीचा मंगळवारपासून (दि. ८) प्रवास सुरू झाला ...
पोलीस प्रशासनाचा पुढाकार: १८० जणांचे अहवाल आले ‘निगेटिव्ह’
बारामती : ‘अनलॉक’च्या दिशेने बारामतीचा मंगळवारपासून (दि. ८) प्रवास सुरू झाला आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना त्यांची दुकाने ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने गुरुवारी (दि १०) अचानक घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तपासणी केली. या वेळी १८० जणांच्या ॲंटिजन कोविड तपासण्या करण्यात आल्या. सुदैवाने सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार वैद्यकीय विभागाच्या मदतीने आज बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सम्यक चौक, इंदापूर चौक याठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्याचे शिरगावकर यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी (दि. ९) बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी (काऱ्हाटी) व खराडेवाडी येथे अँंटिजन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण २४३ संशयितांची ॲंटिजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २४ हजार ८३६ झालेली आहे.तसेच गेल्या २४ तासांत एकूण आरीटीपीसीआर १८८ नमुने तपासण्यात आले.यामध्ये एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-२८ आले आहे. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२ आहेत. काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरीटीपीसीआर ४९ त्यापैकी पॉझिटिव्ह ४, कालचे एकूण ॲंटिजन -६४. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह ५ आले आहेत. गेल्या २४ तासांत बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३७ झाले. त्यात शहर-१४ ग्रामीण-२३. चा समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या-२४हजार ८१६ वर गेली आहे. एकूण बरे झालेले रुग्ण-२३हजार ७०८. आहेत. म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण- २२ पैकी बारामती तालुक्यातील- १५ इतर तालुक्यातील- ७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल दिवसभरातील रुग्णसंख्या ५७ झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.
ज्या नागरिकांचा दुसरा डोस (कोविशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर, ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८ दिवस पूर्ण) प्रलंबित आहे, अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.
डॉ. मनोज खोमणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बारामती.
दुकानांचे मालक, कर्मचाऱ्यांची ॲंटिजन तपासणी
बारामती नगर परिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग यांनी गुरुवारी संयुक्तपणे शहरातील दुकानातील मालक व कर्मचारी यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोग होणार आहे. आज विविध दुकानांमध्ये एकूण १०० तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.
बारामती शहरात पोलिसांच्या पुढाकारातून आरोग्य विभागाने नागरिकांची अँटिजन तपासणी केली.
१००६२०२१-बारामती-०४