चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर---
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:11+5:302021-08-24T04:13:11+5:30
एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील वासुली, शिंदे, भांबोली, सावरदरी, वराळे या भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या कार्यरत आहेत. या ...
एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील वासुली, शिंदे, भांबोली, सावरदरी, वराळे या भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास महामंडळाला महसूल मिळतो आहे. यातून उच्च प्रतिच्या वीज, पाणीपुरवठा आणि रस्ते देण्याची जबाबदारी आहे. परंतु रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याने दर वर्षी डागडुजी करावी लागते आहे. या रस्त्यांवरून शेकडो टन वजनाची मालवाहू वाहने, कामगार वाहतूक बस, हलक्या वजनाची चारचाकी वाहने, तसेच दुचाकीस्वार ये-जा करत आहेत.
सुरू असलेल्या पावसाने एमआयडीसीमधील निकृष्ट दर्जाचे काम असलेल्या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या संख्येने खोलवर खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साठल्याने डबकी तयार झाली आहे. रात्रपाळीच्या कामगारांना दुचाकीवरून प्रवास करताना अशा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे लहान-मोठे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मध्येच खड्डे येत असल्याने मालवाहू वाहने जोराने खड्ड्यात आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे, तरी औद्योगिक विकास महामंडळाने अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ोली आहे.
230821\20210822_145326.jpg
फोटो - चाकण एमआयडीसी रस्त्यावर पडलेले खड्डे.