रस्तेखोदाई सुरूच; प्रशासनाची नामुष्की

By admin | Published: May 9, 2015 03:26 AM2015-05-09T03:26:28+5:302015-05-09T03:26:28+5:30

महापालिकेने बंदी करूनही महावितरणकडून विधी महाविद्यालय रस्ता येथील अशोकपथच्या परिसरात रस्ते खोदाई सुरूच आहे.

Road closures; Misuse of administration | रस्तेखोदाई सुरूच; प्रशासनाची नामुष्की

रस्तेखोदाई सुरूच; प्रशासनाची नामुष्की

Next

पुणे : महापालिकेने बंदी करूनही महावितरणकडून विधी महाविद्यालय रस्ता येथील अशोकपथच्या परिसरात रस्ते खोदाई सुरूच आहे.
विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पथ विभागास माहिती दिल्यानंतर पथ विभागाच्या प्रमुखांनी याची दखल घेण्याऐवजी आपण त्या परिसरातील अधिकाऱ्यांशी बोला, अशी भूमिका घेत जबाबदारी टाळण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकीकडे पावसाळयापूर्वी शहरातील रस्ते पूर्ववत करण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. तर याबाबत माहिती देऊनही शुक्रवारी दिवसभर शहरात गेल्या काही महिन्यांत खासगी केबल कंपन्या, महावितरण, बीएसएनएल तसेच एमएनजीएलकडून बेसुमार रस्तेखोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मागील महिन्यात महापौरासंह, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे खासदार, सभागृह नेते, महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र बैठका घेऊन १ मे नंतर पाणी पुरवठा आणि ड्रेनेज वगळता कोणत्याही प्रकारची खोदाई शहरात करण्यात येणार नसल्याचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीही पथ विभागास हे आदेश दिले आहेत. मात्र, अशोकपथ येथे महावितरणकडून शुक्रवारी दिवसभर खोदाई सुरू होती. या वेळी काही कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी आपल्यास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

Web Title: Road closures; Misuse of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.