लौकी येथे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:25+5:302021-05-09T04:11:25+5:30
मागील पंधरा दिवसांत येथे झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्याची अवस्था आणखीच दयनीय झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे लौकी गावातील शेतकरी, ...
मागील पंधरा दिवसांत येथे झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्याची अवस्था आणखीच दयनीय झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे लौकी गावातील शेतकरी, ग्रामस्थ व दूधगाड्या चालक यांना या खराब रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मधलामळा ते राणूबाई मंदिर या एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण गेले कित्येक वर्ष झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाला गेली वर्षभर तोंडी वारंवार सांगून सुद्धा खड्डे न बुजवता एखादा अपघात होण्याची वाट ग्रामपंचायत पाहते काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आता तरी ग्रामपंचायतीने पावसाळा सुरू होण्याआधी खड्ड्यामध्ये मुरूम टाकून रस्ते सुस्थितीत करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे.
०८ मंचर
लौकी (ता. आंबेगाव ) येथील मधला मळा ते राणूबाई मंदिर रस्त्याची झालेली दुरवस्था.