बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:52 AM2018-09-15T00:52:09+5:302018-09-15T00:52:13+5:30

१०१ शेतकऱ्यांचे २३.३९ हेक्टर क्षेत्र झाले संपादित

The road to the driveway was stopped | बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले

बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले

Next

दावडी : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे बाह्यवळणाचे काम रखडले असून, रुंदीकरणाला सुरुवात झाली. मात्र, काही कामांची गती थंडावली असून, मागील दीड वर्षापासून तर बाह्यवळणाचे कामच ठप्प झाले आहे. अर्धवट स्वरूपात असलेल्या कामामुळे पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरात मोठी वाहतूककोंडी होते. याचा त्रास वाहनचालकांना, नागरिकांना सहन करावा लागत असून, हे बाह्यवळणाचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
राजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे, भांबूरवाडी व राक्षेवाडी या गावांतील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित झाले. बाह्यवळणाबाबत तिढा मिटला असून, जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकºयांना जमिनींचा मोबदला मिळाला आहे. कुठल्याही शेतकºयाची बाह्यवळण शेतजमिनीतून करण्यासाठी हरकत राहिली नाही. बाह्यवळणाचे घोडे कुठे अडले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. या मार्गामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडी सुटून वेळेची तर बचत होणारच आहे. मात्र, अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. चांडोली, होलेवाडी, राक्षेवाडी, टाकळकरवाडी, ढोरे, भांबुरवाडी, झनझनस्थळ या परिसरातून हे बाह्यवळण मार्ग काढण्यात येणार आहे.
डोंगरदºया उकरून बाह्यवळणाचे काम करण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी दसºयाच्या दिवशी मोठा गाजावाजा करीत बाह्यवळणाच्या कामाला सुरुवात झाली होती. शेतकºयांच्या उभ्या पिकांतून तसेच झाडे, झुडपे जेसीबी, पोकलँड यंत्राद्वारे उखडून काढण्यात येऊन रस्ता तयार करण्यास सुरुवात केली होती. होणाºया रस्त्याच्या जागेवर दोन्ही बाजूने चर उकरण्यात आले आहेत. मात्र, फक्त चार दिवस काम सुरू होते. त्यानंतर हे काम बंद पडले आहे.

खेड घाट ते चांडोली येथील बाह्यवळणाचे नवीन टेंडर काढण्यात आले आहे. त्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे. सध्या काम बंद आहे. ५ ते ६ महिन्यांत बाह्यवळणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- प्रशांत खोडसकर,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग

बाह्यवळण करणारा पहिला ठेकेदार पळून गेला. त्यामुळे काम ठप्प आहे. खेडमधील कांदा लसूण केंद्रांचा जागेसंबंधी प्रश्न प्रलंबित आहे. या महामार्गावर नेमलेले १० अधिकारी बदलून गेले, त्याजागी नवीन आले. शेतक ºयांच्या अडचणी आहेत. मी वारंवार संसदेत आवाज उठवून या रस्त्यासाठी पैसे उपलब्ध केले आहेत. अंदाजपत्रक करण्याचे काम सुरू असून, दोन महिन्यांत ते दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन टेंडर निघून कामास सुरुवात होईल.
- शिवाजी आढळराव पाटील, (खासदार शिरूर लोकसभा)

ज्या शेतकºयांच्या जमिनीतील बाह्यवळणात अडथळा ठरणारी घरे, विहिर, बोअर, झाडे, पाईपलाईन यांचेही मूल्यांकन होऊन याबाबत संबंधित शेतकºयांना नोटिसा बजाविण्यात आल्या.
काही शेतकºयांना त्यांचाही मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे बाह्यवळणासाठी कुठलीही अडचण राहिली नाही. हे काम लवकर सुरु करावे अशी मागणी होत आहे.
अर्धवट कामामुळे वाहतुक कोंडी नित्याची झाली आहे. महामार्ग ठप्प होत आहे.

Web Title: The road to the driveway was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.